मधुमेह,डायबेटिस हा एक छुपा रुस्तम

मधुमेह,डायबेटिस हा एक छुपा रुस्तम आहे.सायलेंट किलर ही म्हणू शकतो.अलीकडे अगदी तरुणांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंतच्या कोणत्याही वयोगटातील लोकांना हा विकार मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. वारंवार लघवी होणे, लघवी गढूळ होणे, अंगाला खाज सुटणे, थकवा जाणवणे, हातापायाला मुंग्या येणे, हातापायाची आग होणे, प्रामुख्याने अशी लक्षणे जाणवतात..हा रुग्णाला आतून पोखरतो. रक्तदाब, हृदयरोग, अर्धांगवायू, किडनीचे विकार व डोळ्यांचे आजार पसरवतो. .यावर आपण खालील प्रमाणे सहज/सोपे/ स्वस्त उपचार करू शकतो..
१)३ ते ४ भेंडी ची वरची व खालची टोके कापणे. नंतर त्या भेंड्यांना ४ उभे चिरे मारावे. व त्या भेंड्या पूर्ण बुडेल इतक्या ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजत ठेवाव्या. सकाळी उठल्यावर त्याच पाण्यात हाताने चांगल्या कुस्कुरून /चेचून घ्याव्या व नंतर तेच पाणी गाळणीने गाळून पिऊन टाकावे. हे दररोज करावे. म्हणजे सातत्य ठेवावे. भेंडी १२ ही महिने मिळते. हा अत्यंत प्रभावी उपाय आहे.
२). रोज १ सागरगोटी फोडून आतील बी पारिसवर /सहाणेवर उगाळून ते चाटण रोज सकाळी चाटावे. रोज सातत्याने वर्षभर घेतल्यास मधुमेह शरीराच्या बायोलॉजिकल सिस्टीम मधून निघून जातो. सागरगोट्या रस्त्याच्या कडेला जाडी-बुटी विकणाऱ्या विशेषतः;पारधी स्त्रियांकडे हमखास उत्तम व स्वस्त मिळतात. आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सुद्धा मिळतात.
३) रसायन चूर्ण रोज सकाळ-संध्याकाळ १ चमचा पाण्याबरोबर घ्यावे.
४) मधुमेह वटी चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी , गोक्षुरादि गुग्गुळ ३-३ गोळ्या सकाळी व रात्री घ्याव्या.
५)]सकाळी व रात्री जेवणानंतर मधुमेह काढा ४-४ चमचे पाण्या सोबत घ्याव्या .
६) ब्राम्ही वटी ३ गोळ्या सकाळी व ३ गोळ्या रात्री घ्याव्या व निद्राकार वटी ६ गोळ्या रात्री घ्याव्या.
७)मधुमेहात किडनी संबंधी त्रास असेल तर गोरुक्षादि गुग्गुळ ६ गोळ्या सकाळी व रात्री घ्याव्या.
८)१ लिटर बाटलीत अर्धा मूठ मेथी टाका. आणि सकाळी उठल्यावर बाटली चांगली हलवून ते पाणी दिवसभर प्यावे. हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे.
९)विश्वास ठेवा निसर्गाचे तुमच्यावर अतोनात प्रेम आहे.

Leave a Reply