स`र्दी/COLD

सर्दी / COLD

हा लहान बालकांपासून म्हाताऱया लोकांपर्यंत सर्वांना १२ ही महिने होणारा आजार आहे.साधारणत:पावसाळ्यात खूप ज्यास्त प्रमाणात होतो.थंडीच्या मौसमात व कडक उन्हाळ्यात सुद्धा बहुतेकांना सर्दी/कोल्ड होते.यावर आपण खालील प्रमाणे सहज/सोपे/घरगुती उपचार करू शकतो.

१.) ज्यांना सर्दी होते त्यांनी प्रत्येक वेळी विड्याची २ पाने असे दिवसातून ४ ते ५ वेळा चावून-चावून खावी. रस गिळून घ्यावा व चोथा ही फेकू नये. शेवटी तो ही गिळून घ्यावा. या विड्याच्या पानात चुना,काठ, सुपारी, तंबाखू असे काहीही मिसळू नये. विड्याची पाने १२ ही महिने हमखास मिळतात. कारण भारतात खैके पान बनारस वाले ९०टक्के शोकीन लोक आहेत

२.) प्रत्येक घरात आले/अद्रक असते.आले छोट्या खलबत्त्यात (दगडी/पोलादी/पितळी/ऍल्युमिनिअम च्या कोणत्याही)चांगले कुटून एकजीव करावे.त्यात एक चमचा मध मिसळून सकाळ-दुपार-संध्याकाळ घ्यावे. शक्यतो मध शासकीय खादी ग्रामोद्योग भांडारातून घ्यावा. खात्रीचा शुद्ध मिळतो.

३) तसेच ३ खजूर (ओले खजूर) बीया काढून कुस्करून घ्यावे.त्यात १ चमचा मध मिसळून ते सकाळ-संध्याकाळ घ्यावे. खजुराने इम्युनिटी पॉवर वाढते. ( सध्या इम्युनिटी पॉवर ची खूप गरज आहे)

४) द्राक्ष्याच्या मौसमात काळी द्राक्षे चावून खावीत . मौसम संपल्यावर काळ्या द्राक्षाच्या मनुका, किसमिस चावून खावे.

५) प्रभावी चहा :- १ कप दुधात थोडी सुंठ पावडर, थोडी दालचिनी पावडर, १वेलची, साखर व कुटलेले अद्रक टाकून चांगले उकळून घ्यावे.व कोमट-कोमट प्यावे. गूळ टाकू नये कारण चहा फाटतो.व चहा वाया जातो.काढा म्हटले की, लोक तोंड वाकडे करतात म्हणून हा मध्यम मार्ग बरा.


६) ज्यांना १२ ही महिने कायम सर्दी असते त्यांनी तमालपत्र =तेजपान, लवंग, हंसराज, सुंठ,काळे मिरे, पिंपळी, वेलची,,याची अंदाजाने पावडर करून ठेवावी. व याचा काढा सकाळ-संध्याकाळ घ्यावा.


७) सकाळी १ कप दुधात ५पिंपळी, २मिरे, थोडी सुंठ, पावडर व साखर टाकून प्यावे. तसेच रात्री भिजवून साल काढलेल्या २ बदामाच्या बिया,५ काळे मिरे, व ५ मनुके खलबत्त्यात एकजीव करावेव १ चमचा लोण्या मध्ये मिसळून खावे.


८)ओवा खलबत्त्यात कुटून (मिक्सर मध्ये काढू नये)]डब्यात भरून ठेवा. रोज अर्धा चमचा ओवा-पूड १ ग्लास गरम पाण्यात टाकून सकाळ-संध्याकाळ प्या.

Leave a Reply