अ‍ॅसिडिटी/ पोटात होणारी जळजळ/ आग

आयटी क्षेत्र/सॉफ्टवेअर कंपन्यातील नोकरी/नाईट ड्युटी/ जागरण/अनियमित नाश्त्याच्या/जेवणाच्या वेळा आणि बदललेली जीवनशैली यामुळे 99% लोकांना सतावणारा आजार म्हणजेच ऍसिडिटी/ Acidity/पोटात होणारी जळजळ/आग. यावर आपण खालील प्रमाणे सहज/ सोपे /स्वस्त/ घरगुती उपचार करू शकतो.


1) याकरिता रोज शहाळ्याचे पाणी पिणे हा एक उत्तम उपाय आहे. शहाळे बाराही महिने मिळतात.
2) पेरूच्या मोसमात रोज एक पिकलेला पेरू जेवल्यानंतर मीठ आणि काळे मिरे याची पूड लावून खावा.
3) रोज एक चमचा मध चाटून खावा. मध विकत घेताना शासन मान्य खादी ग्रामोद्योग भंडारा तून घ्यावा. खात्रीचा शुद्ध असतो.
4) बेलफळाचे सरबत. हे आयुर्वेदिक दुकानात हमखास उपलब्ध असते. रोज एक ग्लास पाण्यात दोन चमचे बेलाचे शरबत टाकून प्यावे. घरी सुद्धा करू शकतो. 100 ग्रॅम बेलाच्या पिकलेल्या अथवा कच्च्या फळाचा गर अर्धा लिटर पाण्यात टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्यावा आणि गाळणीने गाळून चांगल्या दर्जाच्या प्लास्टिक बॉटल मध्ये भरून त्यात 100 ग्रॅम साखर टाकून मिसळून ठेवा. हेच ऍसिडिटी वरील बेलाचे सरबत.
5) ज्यांना ऍसिडिटी मुळे उलट्या होतात त्यांनी द्राक्षाच्या मोसमात ताजी द्राक्षे चावून खावीत. मौसम संपल्यावर बेदाणे/मनुका/ किस्मिस चावून खावा.
6) आवळ्याच्या रसात काळे मनुका कुस्करून एक चमचा मध कालवून ते चाटण रोज घ्यावे.

7) आयुर्वेदिक दुकानात जांभळाचा शिरका मिळतो. हॅलो रोज एक चमचा शिरका एक ग्लास पाण्यात मिसळून घ्यावा. हा सुद्धा शासन मान्य खादी ग्रामोद्योग मधून घ्यावा. म्हणजे चांगल्या दर्जाचा शुद्ध मिळतो.
8) कारले कडू असतात, सर्वांनाच ते आवडत नाही. परंतु कारल्याचा रस प्रभावी असतो. कारल्या मधील बिया काढून खूप बारीक तुकडे करावे ते एक ग्लास पाण्यात टाकून ते मिक्सरमध्ये चांगले एकजीव करून गाळून घ्यावे व प्यावे.