हृदय विकार / HEART ATTACK / CARDIAC ARREST.

अगदी तरुणांपासून वृद्ध व्यक्ती पर्यंत च्या वयोगटातील लोकांना हा विकार मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. साधारणता: या विकारात छातीत डावीकडे दुखणे, अचानक गरम वाटणे, अस्वस्थ वाटणे, चक्कर येणे, जीव घाबरणे ,जिने चढतांना -उतरतांना दम लागणे , श्वास घ्यायला त्रास होणे , अचानक जीव घाबरून अंगातला शर्ट काढून टाकावा असे वाटणे ,ही लक्षणे म्हणजे हृदय विकाराची लक्षणे असू शकतात. अश्या वेळी अजिबात वेळ न घालवता 1ST स्टेज म्हणजे . ताबडतोब ईसीजी काढून घ्यावा.

यावर आपण खालील प्रमाणे सहज/सोपे/ स्वस्त/घरगुती उपचार करू शकतो .
१) लसूणच्या २ते ४ पाकळ्या दह्यात भिजवून ठेवा. सकाळी त्या दह्यातून काढून २ते ३ वेलची व २ते ३ लवंगासह चावू -चावून खा त्यावर २ चमचे मध घातलेले१ ग्लास दूध प्या. हृदय विकारावर अत्यंत प्रभावी आहे. हृदयविकार असणाऱ्यांनी १ चमचा अमृतकल्प सकाळ-दुपार-संध्याकाळ ३ वेळा खा.
२) संत्र्याच्या मौसमात १ ग्लास संत्र्याचा रस व १ मोठा चमचा मध घ्यावा. त्यामुळे हृदयाचे स्नायू बळकट होतात.
३) हृदयविकार असणाऱ्यांनी आहारात शक्यतो सैंधव मीठ म्हणजेच शेंडे मीठ म्हणजेच ROCK SALT वापरावे.
४) अर्जुन साल सिद्ध दूध सकाळ-संध्याकाळ २वेळा घ्यावे. आपण हे घरी असे करू शकतो. : १० ग्राम अर्जुन
साल पावडर १ ग्लास दूध व २ ग्लास पाण्यात टाकून ते १ ग्लास आटे पर्यंत उकळावे.
५) अर्जुन साल सिद्ध घृत सकाळी व संध्याकाळी २ चमचे घ्यावे.
६) गव्हांकुराचा रस :- अतिशय प्रभावी आहे.१ग्लास रोज उपाशी पोटी घ्यावा. ताज्या गव्हांकुराचा रस अतिशय
प्रभावीपणे काम करतो. परंतु रोपे घरी तयार करणे त्रासदायक ठरते म्हणून बाजारातील हर्बल -WHEET
ग्रास चांगल्या दर्जेदार कंपनी चे वापरावे. घरच्या घरी रोपे तयार करू शकतो. त्यासाठी ७कुंड्या व माती लागते.
जसे सोमवारी कुंडीत गहू पेरले तरआठव्या दिवशी म्हणजे येण्याऱ्या सोमवार पर्यंत चांगले वाढतात. या प्रमाणे
रोज प्रत्येक कुंडीत गहू पेरून ते आठव्या दिवशी वापरावे. जसे:-सोमवारी पेरलेले पुढील सोमवारी. मंगळवारी
पेरलेले पुढील मंगळवारी. या प्रमाणे. तसेच हैड्रोफोनिकल्ली पद्धतीने म्हणजेच सॉईल लेस मेथड ने
सुद्धा रोपे उगवू शकतो. “
उगवू शकतो.

Leave a Reply